dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मानोरा : साडीचा पदर टायरमध्ये अडकला; महिलेचा जागीच मृत्यू

मानोरा : मोटारसायकलच्या मागील चाकात साडीचा पदर अडकून झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास कुपटा गावाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

मानोरा : मोटारसायकलच्या मागील चाकात साडीचा पदर अडकून झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास कुपटा गावाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

प्राप्त माहितीनुसार, आसोला खुर्द येथील उषाबाई पुरुषोत्तम गिरी या दुचाकीवरून लग्नानिमित्त बाहेरगावी जात असताना हा अपघात झाला. कुपटा गावाजवळ पोहोचताच त्यांच्या साडीचा पदर अचानक मोटारसायकलच्या मागील टायरमध्ये अडकला. त्यामुळे संतुलन बिघडून त्या रस्त्यावर खाली पडल्या. या अपघातात उषाबाई गिरी यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. जखमा अतिशय गंभीर असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मृत उषाबाई गिरी या प्रसिद्ध संत व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या पुरुषोत्तम महाराज यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या अकाली निधनामुळे आसोला खुर्द गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे दुचाकीवर प्रवास करताना साडी किंवा ओढणी यांसारख्या वस्त्रांबाबत काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top