बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर अकोला एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाभुळगाव नजीक कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना 2 मे शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली या अपघातात

बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर अकोला एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाभुळगाव नजीक कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना 2 मे शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली या अपघातात
रविंद्र रामकृष्ण अढाव वय ५0 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला
रविंद्र रामकृष्ण अढाव वय ५० वर्ष व त्यांचा मुलगा पियुष रविंद्र अढाव वय १७ वर्ष राहणार पातुर्डा
हे दोघे वाशिंबा येथे त्यांचे नातेवाईकांकडून परत आपल्या गावी
मोटारसायकल क्रमांक एम एच २८ओ व्ही ६१२८ ने वाशिंबा येथुन अकोला कडे जात होते दुचाकी रवींद्र अढाव चालवीत होते तर त्यांचा मुलगा पियुष हा गाडी मागे बसलेला होता दरम्यान बाभुळगाव नजीक जवाहर नवोदय विदयालय जवळ पाठी मागुन येणा-या कार क्रमांक जि जे २६ ऐ ई ९०७३ च्या चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे भरधाव वेगाणे व निष्काळजी पणाने चालुवन कारचे डावे बाजुने समोर जात असलेल्या मोटारसायकल ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार रविंद्र रामकृष्ण अढाव व त्यांचा मुलगा पियुष अढाव हयांना ८ ते १० फुट फरफटत नेले त्यामुळे त्यांचा अपघात होवुन ते दोघे वडील व मुलगा गंभीर जखमी झाले त्यांना कार चालकाने जखमी अवस्थेत अकोला येथे शासकीय रुग्णालयात उपचारा करीता नेले असता तेथे रविंद्र रामकृष्ण अढाव यांना ड्युटी वरील डॉ. सा यांनी तपासुन मृत घोषीत केले तसेच त्यांचा मुलगा पियुष अढाव हयाला सुध्दा गंभीर दुखापत असल्याने त्याला उपचारासाठी दाखल केले,
दरम्यान घटनेची माहिती मिळताच आयपीएस अधिकारी इशानी आनंद मॅडम, पोलिस उपनिरीक्षक स्वाती वानखडे, हेडकॉन्स्टेबल सचिन धनबहादुर, हेडकॉन्स्टेबल अशोक मराठे , संतोष डाबेराव यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला तर पोलिसांनी कार सह चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास अकोला एमआयडीसी पोलिस करीत आहेत


