dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

घाटीतील युजीच्या ५०, पीजीच्या ८५ जागा वाढीचा मागवला प्रस्ताव: २०२.५ कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) युजीच्या (एमबीबीएस) ५० जागा, तसेच पीजीच्या (एमडी, एमएस) ११ विषयांतील ८५ जागा वाढविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या जागा वाढविण्यासाठी मनुष्यबळ, यंत्रसामग्री, पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी २०२.५ कोटी रुपयांचा निधी घाटीला मिळण्याची शक्यता आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव, डीएमईआरचे आयुक्त व संचालक यांनी राज्यातील अधिष्ठातांची गेल्या आठवड्यात ऑनलाईन बैठक घेतली. घाटीतील एमबीबीएसच्या ५० जागांसाठी प्रत्येकी दीड कोटी असे ७५ कोटी, व पीजी अभ्यासक्रमांच्या जागा वाढविण्याचा प्रस्ताव असून, ११ विषयांमध्ये एकूण ८५ जागांची वाढ सुचविण्यात आली आहे. या जागा वाढीसाठी प्रति जागा १.५० कोटी रुपये अशा १२७.५० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, वैद्यकीय पदवीपूर्वच्या ५० आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी ८५ जागा वाढणार असून, अधिक विद्यार्थ्यांना संधी मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य शासनाला २७ जानेवारीपूर्वी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मिळाल्या असून, केंद्र शासनाच्या निर्णयानंतर पुढील शैक्षणिक वर्षात या जागा वाढण्याची आशा असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top