dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

सोनलनगर येथे गजानन महाराज प्रकट दिन सोहळा: ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

जालना : संतश्रेष्ठ, योगीराज श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त सोनलनगर भागातील श्री संत गजानन महाराज संस्थान येथे ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जालना : संतश्रेष्ठ, योगीराज श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त सोनलनगर भागातील श्री संत गजानन महाराज संस्थान येथे ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी श्रींची पूजा होईल. सायंकाळी हरिपाठ व आरतीनंतर रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत ह.भ.प. आप्पासाहेब महाराज मुळे यांचे हरिकीर्तन संपन्न होणार आहे. शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी श्रींची पूजा होईल. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता श्री संत सद्गुरू प्रेमानंद बाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था यांचा हरिपाठ, श्रींची आरती व प्रसाद होईल. त्यानंतर ह.भ.प. विष्णु महाराज बारड (रेवगाव) यांचे हरिकीर्तन होणार आहे. रविवारी पहाटे श्रींची पूजा व अभिषेक होईल. सकाळी ६ ते १० या वेळेत नगरप्रदक्षिणा (शोभायात्रा) काढण्यात येईल. सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत भागवताचार्य ह.भ.प. सतीश महाराज बनकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.

भाविकांनी या तीन दिवसीय प्रकट दिन सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top