झांजर्डी येथे तरुणाची आत्महत्या

ढोरेगाव :  गंगापूर तालुक्यातील झांजर्डी येथे २२ वर्षीय तरुणाने स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार, 15 मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. 

ढोरेगाव :  गंगापूर तालुक्यातील झांजर्डी येथे २२ वर्षीय तरुणाने स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार, 15 मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. राधाकिसन सिताराम रोडगे (२२ वर्ष), रा.झांजर्डी, ता. गंगापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

राधाकिसन रोडगे गुरुवारी सकाळी दहा वाजता स्वतःच्या शेतात वखर मारण्यासाठी गेला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास काही शेतकऱ्यांना राधाकिसन हा लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच राधाकिसन याचा भाऊ रामकिसन रोडगे व इतर शेतकऱ्यांनी राधाकिसन रोडगे याला फासावरुन खाली उतरवून बेशुध्दावस्थेत उपचारासाठी गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी गंगापूर पेालिस ठाण्यता आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास बिट अंमलदार अमित पाटील करीत आहेत. मयत राधाकिसन रोडगे याने आत्महत्या का केली याचे कारण समजू न शकल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »