बुलढाणा : पक्ष कार्यालयाचे भूमिपूजन हा सर्व कार्यकर्त्यांसाठीच आनंदाचा क्षण असतो, जो आज संपन्न झाला. कार्यालय हे ‘पक्षाचे घर’ असते. याच अनुषंगाने ‘भाजपा महाराष्ट्र’ने प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षाचे हे घर निर्माण करण्याचा निर्धार केला. येत्या काळामध्ये महाराष्ट्रातील एकही जिल्हा असा असणार नाही जेथे भाजपा कार्यकर्त्यांचे हे हक्काचे कार्यालय असणार नाही. या भाजपा कार्यालयाच्या माध्यमातून आपण जनसामान्याला आपलेसे वाटणारे वातावरण तयार करतो की नाही, यावरून कार्यालयाची भव्यता ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शुक्रवारी १६ मे रोजी बुलढाणा येथे भाजपा जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन मुख्य़मंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थित भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांसमवेत संवाद साधला.
विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचा आपला प्रयत्न आहे. यादृष्टीने सिंचनाच्या सोई उभारणे, रस्त्यांचे आणि उद्योगांचे जाळे विणणे, येणार्या पिढ्यांच्या हाताला काम देण्याचे कार्य अत्यंत वेगाने सुरू आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपले सरकार वेगाने काम करत आहे. आपल्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद असाच पाठीशी ठेवत आपली लोकाभिमुखता अशीच कायम जपण्याचे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आ. चैनसुखजी संचेती, आ. श्वेताताई महाले, आ. वसंत खंडेलवाल, बुलढाणा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
भाजपाच्या विचारांची पाळेमुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आधीपासूनच
जनसंघाच्या काळापासून विविध ठिकाणी मिळेल त्या परिस्थितीमध्ये आपण भाजपा कार्यालये चालवली. आज जगातील आणि महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा पक्ष भाजपा आहे. एकट्या महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी डिजिटली वेरिफाईड सदस्यांचे पाठबळ असलेला आपला पक्ष आहे. भाजपाच्या विचारांची पाळेमुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आधीपासूनच खोलवर रुजलेली आहेत. येथील सर्व जुने-नवे कार्यकर्तेच, या कार्यालयाचे मालक आहेत, असेही फडणवीस म्हणाले.