परभणी : भारतीय जनता पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी शिवाजी भरोसे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी १३ मे रोजी परभणी महानगर जिल्हाध्यक्षपदाची घोषणा केली.

परभणी : भारतीय जनता पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी शिवाजी भरोसे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी १३ मे रोजी परभणी महानगर जिल्हाध्यक्षपदाची घोषणा केली. भाजपच्या शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्त्या गेल्या अनेक दिवसांपासून रखडल्या होत्या. महानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले शिवाजी भरोसे हे यापूर्वी महानगरपालिकेचे सदस्य राहिले आहेत. त्यांच्या निमित्ताने एका तरुण चेहऱ्याला पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली आहे. शिवाजी भरोसे यांची परभणी महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांचे कौतूक करण्यात येत आहे.