नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो भारत दौऱ्यावर असून, त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांमध्ये सुरक्षा, व्यापार आणि नवीन तंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो भारत दौऱ्यावर असून, त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांमध्ये सुरक्षा, व्यापार आणि नवीन तंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. मार्को रुबियो हे ‘क्वाड’च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारतात आले आहेत. परंतु, एकंदरीत जागतिक परिस्थिती पाहता रुबियो यांचा भारत दौरा अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. भारत-अमेरिका यांच्यातील ‘सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी’मधील सातत्यपूर्ण प्रगतीवर, तसेच प्रादेशिक व जागतिक शांतता आणि सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. जागतिक हितासाठी भारत आणि अमेरिका यापुढेही परस्परांशी निकटचा समन्वय साधून कार्यरत राहतील, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे.
मोदींना ट्रम्प यांचे अमेरिकेला येण्याचे निमंत्रण
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी शनिवारी सेवा तीर्थ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने पंतप्रधान मोदींना अमेरिकेला येण्याचे निमंत्रण दिले. मोदी आणि रुबियो यांच्यात एक तासाहून अधिक काळ बैठक चालली. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या व्यतिरिक्त एनएसए अजित डोवाल देखील उपस्थित होते.


