dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

चीनमध्ये कोळसा खाणीत स्फोट; 90 कामगारांचा मृत्यू

बीजिंग : चीनच्या शांक्सी प्रांतातील एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात किमान 90 लोकांचा मृत्यू झाला. हा अपघात चीनमधील गेल्या दशकातील सर्वात मोठा कोळसा खाण अपघात मानला जात आहे. यात अनेक कामगार अडकल्याची भीती आहे.

बीजिंग : चीनच्या शांक्सी प्रांतातील एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात किमान 90 लोकांचा मृत्यू झाला. हा अपघात चीनमधील गेल्या दशकातील सर्वात मोठा कोळसा खाण अपघात मानला जात आहे. यात अनेक कामगार अडकल्याची भीती आहे.

चीनच्या उत्तरेकडील शान्शी प्रांतातील एका कोळसा खाणीत प्रचंड वायू स्फोट झाला. त्या वेळी मोठ्या संख्येने कामगार खाणीच्या आत (भुगर्भात) काम करत होते. खाणीच्या आत सुमारे 247 कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शनिवारी सकाळी सुरुवातीला आठ जणांचा मृत्यू झाल्याचे आणि 38 कामगार अडकल्याचे वृत्त होते. तथापि, त्यानंतर मृतांचा आकडा वाढून 90 वर पोहोचला. अपघातानंतर, मदत आणि बचाव कार्य तीव्र करण्यात आले आहे. खाणीच्या आत अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकं अथक प्रयत्न करत आहेत. स्फोटाच्या कारणांची चौकशी सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जखमींना वैद्यकीय उपचार पुरवण्यासाठी आणि आत अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत.

स्फोटाचे खरे कारण अद्यापही अस्पष्ट 

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून, यासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचना केली आहे. खाणीचे कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट असले, तरी प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, खाणीच्या आत कार्बन मोनोऑक्साईडचे प्रमाण विहित सुरक्षा मर्यादेपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक होते. हा वायू अत्यंत विषारी आणि गंधहीन असून, बंदिस्त जागेत तो प्राणघातक ठरू शकतो.

345 कर्मचाऱ्यांकडून मदतकार्य 

अपघातानंतर चीनच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने मदतकार्यासाठी सहा बचाव पथकांमधील 345 कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले आहेत. ही बचाव पथके ढिगारा हटवण्यासाठी आणि खाणीत अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अविरतपणे कार्यरत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top