बुलढाणा : गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करण्याची मागणी राजारामपुरी पोलिसानी न्यायालयात केली होती.

धमकी प्रकरणावरून न्यायालयाचा आदर पण भूमिकेवर ठाम : आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया
बुलढाणा : गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करण्याची मागणी राजारामपुरी पोलिसानी न्यायालयात केली होती. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य केल्याने आ. गायकवाड यांच्या चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात आमदार गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवीगाळ प्रकरणी मी दिलगिरी व्यक्त केली होती, मात्र, छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख होत असेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे.शिवाजी कोण होता?, दगलबाज शिवाजी या पुस्तकांवर बंदी आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितले. या अनुषंगाने, कोर्टाने जी आदेश दिले त्याचा मी आदर करतो, असेही ते म्हणाले.


