जळगाव जामोद : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना 25 मे रोजी सकाळी उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने आपल्या चार चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून स्वतः ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत व्यक्ती जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील रहिवासी आहे.

जळगाव जामोद : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना 25 मे रोजी सकाळी उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने आपल्या चार चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून स्वतः ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत व्यक्ती जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील रहिवासी आहे.
घरी काम करत असतांना विजय मुसा किराडिया (35) याला त्याचे वडिलांनी तु घर काम का करत आहे, असे म्हटल्याने त्याला राग अनावर झाल नाही. यावेळी त्याचे पत्नी सोबत काहीतरी किरकोळ वाद झाले. त्यामुळे पत्नीला माहेरी पाठवून त्याने मुलगी प्रीत विजय किराडिया (7), मुलगी प्राची किराडिया (5), पूर्वी किराडिया (4), पियूष विजय किराडिया (2) या आपल्या चार मुलांना घेवून तो परत गावाकडे आला. यावेळी त्याने राजुरा धरण परिसरातील एका विहिरीमध्ये त्याच्या चारही निष्पाप चिमुकल्या मुलांना ढकलुण दिले. त्यानंतर त्यानेही स्वतःही विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. विजय किराडिया याने घरगुती वादातून पत्नीला माहेरी सोडल्यानंतर गावी परत येताना हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून वडील आणि चार मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे भाले अंजन गावासह संपूर्ण जळगाव जामोद तालुक्यात शोककळा पसरली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
संपूर्ण संसार क्षणातच उध्दवस्त
विजय किराडिया यांच्या एका चुकिच्या निर्णयाने चिमुकल्या चार निष्पाप मुलांचा बळी गेला आहे. एकाच वेळी पती आणि सर्व मुलांचा बळी गेल्याने विजय किराडिया यांची पत्नी एकाकी पडली असून तिचा संपूर्ण संसार उध्दवस्त झाला आहे. या घटनेने जळगाव जामोद परिसरात हळहळ व्यक्त होत असून किरकोळ घरगुती वाद इतक्या विकोपाला जाईल असे कोणालाही वाटले नव्हते.
राजुरा धरण क्षेत्र बनतोय हत्या, आत्महत्येचा स्पॉट
जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा जंगल भाग हा मध्यप्रदेशच्या सिमेलगत असून याठिकाणी मानवी वर्दळ अत्यंत कमी आहे. त्यामुळे याठिकाणी नेहमीच अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही दिवसाअगोदर एका पित्याने आणि भावाने मिळून मुलीची हत्या करून राजुरा घाटातील धरणाजवळ तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर 24 मे रोजी भाले अंजग गावातील विजय किराडिया या व्यक्तिने त्याच्या चाल चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून त्यांचा बळी घेत स्वतःही आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुहे याठिकाणी पोलीस आणि वन विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.


