dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अवैध इंधन साठेबाजांवर प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; तोंडगाव धाब्यावरून २०० लिटर डिझेल जप्त

वाशिम : जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या टंचाईमुळे वाहनचालक, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असतानाच, काहीजण या परिस्थितीचा गैरफायदा घेत इंधनाची साठेबाजी व काळाबाजार करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. 

वाशिम : जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या टंचाईमुळे वाहनचालक, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असतानाच, काहीजण या परिस्थितीचा गैरफायदा घेत इंधनाची साठेबाजी व काळाबाजार करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर वाशिम प्रशासनाने अवैध इंधन साठेबाजांविरुद्ध आक्रमक मोहीम सुरू केली असून, शुक्रवारी सायंकाळी उशिरा वाशिम तालुक्यातील तोंडगाव नाका फाटा परिसरातील एका धाब्यावर महसूल विभागाने धडक कारवाई करत तब्बल २०० लिटर डिझेलचा अवैध साठा जप्त केला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर आणि तहसीलदार नीलेश पळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या विशेष पथकाने संबंधित धाब्यावर अचानक छापा टाकला. कारवाईदरम्यान धाब्यावर डिझेलचा मोठ्या प्रमाणात साठा करून त्याची अवैधरित्या विक्री केली जात असल्याचे आढळून आले. सुनील धाडवे यांच्या मालकीच्या या धाब्यावरून २०० लिटर डिझेल जप्त करण्यात आले.

महसूल विभागाच्या पथकाने संपूर्ण परिसराची तपासणी करून इंधन साठवणुकीसाठी वापरले जाणारे साहित्य, कॅन आणि इतर वस्तूंचीही पाहणी केली. जप्त करण्यात आलेला डिझेलचा साठा पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, संबंधित धाबा चालकाविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायदा तसेच संबंधित नियमांनुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सध्या जिल्ह्यात अनेक पेट्रोलपंपांवर इंधनासाठी वाहनांच्या रांगा लागत आहेत. काही ठिकाणी डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा मर्यादित प्रमाणात होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत कृत्रिम तुटवडा निर्माण करून जादा दराने इंधन विक्री करण्याचा प्रकार प्रशासन गंभीरतेने घेत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top