जालना : विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी घेऊन आलेल्या जालना गणेश फेस्टीव्हलमध्ये शनिवार, 30 ऑगस्ट रोजी त्रैभाषिक मुशायरा व कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलावर दुपारी 2 वाजता हा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

जालना : विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी घेऊन आलेल्या जालना गणेश फेस्टीव्हलमध्ये शनिवार, 30 ऑगस्ट रोजी त्रैभाषिक मुशायरा व कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलावर दुपारी 2 वाजता हा बहारदार कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रामराव रिंढे हे राहतील. हिंदी कवी कमल किशोर शर्मा, डॉ. सलीम नवाज हशर, अब्दुल रज्जाक रहबर, शिवकुमार बैजल हे सहभागी होतील. संमेलनाचे सुत्रसंचलन प्रा.पंढरीनाथ सारके हे करतील. या कविसंमेलनाचा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन गणेश फेस्टीव्हलच्या आयोजकांनी केले आहे.
यावेळी कवयित्री रेखा बैजल , डॉ.संजीवनी तडेगावकर, कवी सुनील लोणकर, गोविंदप्रसाद मुंदडा, कविता बोरगावकर, राजाराम जाधव , भीमराव सपकाळ, किशोर ज-हाड, प्रदीप इक्कर, कल्याणी देशमुख, रमाकांत कुलकर्णी, विठ्ठल काष्टे, सुरेश कायटे, शंकर कपाळे, प्रकाश कुंडलकर, पंडित वराडे, श्रीकांत गायकवाड, विनायक काळे, माधवी चव्हाण, गोवर्धन मुळक, वसंत कोलते, उत्तमराव शेजवळ, विद्या दिवटे, जगन्नाथ काकडे, सत्यशिला तौर, कैलास भाले, शिवाजी कायंदे, डॉ.प्रभाकर शेळके, डॉ.सुहास सदाव्रते, डॉ .शशिकांत पाटील, राम गायकवाड ,प्रा. अशोक खेडकर, मनीष पाटील रत्नमाला मोहिते, रेखा गतखणे, शिवाजी तेलंगे , डॉ. दिगंबर दाते, विनोद जैतमहाल, सुहास पोतदार, डॉ. एकनाथ शिंदे, साहिल पाटील, दिनेश शेळके, विनोद काळे, मनीषा गायकवाड, छाया वाघ, गणेश खरात, डॉ.राज रणधीर, लक्ष्मीकांत दाभाडकर,प्रा. शोभना भालेराव, जिजा वाघ, कृष्णा कदम, आबासाहेब म्हस्के, किशोर भालेराव, वैशाली फुके, समाधान खाडे हे मराठी कवी सहभागी होतील.
गझल मुशायरा
यावेळी आयोजित गझल मुशायऱ्यात उर्दू कवी आरिफ भाई, डॉ .रिहान दानिश, अब्दुल हसीब फतहान, हाफिज अनिस, नाजीम खान ( सेवली ), अब्दुल रहीम, जोहर हुसेन ताहेर, परवेज आलम, नईम खान नईम यांचा सहभाग राहील.
