संग्रामपूर : जुन्या वादातून विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी सदर तक्रार मागे घेण्याचे कारणावरून संग्रामपूर तालुक्यातील निवाना येथे बारा जणांनी घरात घुसून २७ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला चढवून त्याची निर्गुण हत्या केल्याची घटना 28 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

संग्रामपूर तालुक्यातील निवाना गावामध्ये पारधी समाज आणि धनगर समाज कुटुंब वास्तव्याला आहे. यातील मोहे आणि सोळंके या कुटुंबामध्ये जुना वाद होता. सोळंके कुटुंबातील सोपान दिगंबर सोळंके याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची तक्रार मागे घेण्यासाठी मोहे कुटुंबावर सोळंके कुटुंबाकडून अनेक वेळा दबाव टाकण्यात आला. परंतु सदर तक्रार मागे न घेतल्याने 28 ऑगस्ट रोजी चिडून जाऊन मंगलसिंग जालमसिंग सोळंके (55), वैभव मोहनसिंग सोळंके (22), जीवनसिंग झामसिंग सोळंके (52), अमोल जीवनसिंग सोळंके (27), सुरज मंगलसिंग सोळंके (28) आकाश मंगलसिंग सोळंके (27) ईश्वर उर्फ बारक्या मोहनसिंग सोळंके (22) मानसिंग विजयसिंह सोळंके (30) राजेश विजयसिंह सोळंके (23) अजय घनश्याम पवार (19) दत्ता घनश्याम पवार (22) महेश शिवहरी सोळंके (30) यांनी धारदार शस्त्र हातात घेऊन ऋषिकेश सुभाष मोरे (27) याच्या घरामध्ये प्रवेश करून वाद घालत त्याला व त्याच्या कुटुंबाला मारहाण केली तसेच ऋषिकेश मोहे याला धारदार शस्त्राने मारून ठार केले. या प्रकरणी मृताचा भाऊ प्रज्वल सुभाष मोहे (25) याने तामगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी उपरोक्त 12 जणांविरुद्ध कुणाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय राजेंद्र पवार हे करीत आहेत.