जालना : एका ऑटो रिक्षातून प्रतिबंधित असलेल्या गोमांसाची वाहतूक केली जात असल्याच्या संशयावरून संतप्त ग्रामस्थांनी ऑटो रिक्षाची तोडफोड केली. ही घटना शहरालगतच्या रेवगाव रोड परिसरात सोमवार, 18 में रोजी सकाळी घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेवगाव रोडवर ग्रामस्थांनी संशयावरून एका ऑटो रिक्षाला अडवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात संशयित गोवंशाचे मांस आढळून आल्याचा दावा करण्यात आला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधित ऑटो रिक्षाची तोडफोड केली.
घटनेची माहिती मिळताच गौरक्षक दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनाची पाहणी केली. प्राथमिक तपासात वाहनामध्ये गोवंश जातीचे मांस असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत अंदाजे १५० किलो संशयित गोवंश मांस जप्त केल्याची माहिती गौरक्षक दलाचे पदाधिकारी राहुल वर्तले यांनी दिली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित व्यक्तींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.