परभणी : इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून सुरू असलेली ऑनलाईन औषध विक्री,ई-पोर्टल तसेच जीएसआर ८१७(इ), २८ ऑगस्ट २०१८ आणि कोविड काळातील जीएसआर २२०(इ) २६ मार्च २०२० हे निर्णय मागे घेण्यात यावे या मागणीसाठी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (एआईओसीडी) यांच्या वतीने बुधवार, 20 मे रोजी अखिल भारतीय औषधी विक्रेता बंद पाळणार असल्याची माहिती गंगाखेड केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे.

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत संघटनेने वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करुनही शासनाने संघटनेच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे. तसेच ऑनलाईन औषधी विक्री होत असल्याने औषधी विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. औषध विक्रेत्यांच्या मागण्या व भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. बंद काळात अत्यावश्यक सेवेची आवश्यकता भासल्यास तालुका संघटनेचे अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी सहकार्य करतील, असेही संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (एआईओसीडी) यांच्या वतीने सोमवार, 18 मे रोजी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांना औषध विक्रेत्यांच्या संपाबाबत निवेदन सादर करण्यात आले. उपविभागीय अधिकारी डापकर यांना देण्यात आलेल्या निवेदनावर अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गुंडाळे, तालुकाध्यक्ष संदीप कोटलवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नंदकुमार भरड, शहराध्यक्ष कारभारी निरस, उपाध्यक्ष राधाकृष्ण राखे, सचिव अक्षय जैन, कोषाध्यक्ष बालाजी गुंडाळे, अनिल कलकोटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.