dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अनेक वर्षांपासूनचे जिल्हावासियांचे खामगाव- जालना रेल्वे मार्गाचे स्वप्न पूर्ण होणार | Khamgaon-Jalna railway line

Khamgaon-Jalna railway line : खामगांव-जालना रेल्वे मार्गाला अंतीम मंजूरातीची गोड बातमी जिल्हावासियांना लवकरच मिळणार आहे. खामगांव-जालना रेल्वे मार्गा संदर्भात शुक्रवारी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रिय रेल्वे अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली असून, खामगांव-जालना रेल्वे मार्गाबद्दल पाठपुरावा सुरू आहे.

बुलढाणा : खामगांव-जालना रेल्वे मार्गाला अंतीम मंजूरातीची गोड बातमी जिल्हावासियांना लवकरच मिळणार आहे. खामगांव-जालना रेल्वे मार्गा संदर्भात शुक्रवारी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रिय रेल्वे अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली असून, खामगांव-जालना रेल्वे मार्गाबद्दल पाठपुरावा सुरू आहे.

  बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरणारा आणि मध्य व सेंट्रल रेल्वेला जोडणारा महत्वकांशी असा  खामगाव जालना रेल्वे  मार्ग पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आला आहे या रेल्वे मार्गासाठी लागणारा 50% निधीचा वाटा राज्य सरकारने उचलला असून त्या संदर्भाची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे त्यानंतर या संदर्भाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार  प्रतापराव जाधव यांच्यावतीने सातत्याने रेल्वेमंत्री आणि रेल्वेमंत्र्याकडे या रेल्वेमार्गासंदर्भाचा पाठपुरावा सुरू आहे या रेल्वे मार्गामुळे   जिल्ह्याच्या विकासालाही गती  मिळणार आहे त्या दृष्टिकोनातून खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी 50 टक्के आर्थिक निधीची तरतूद संदर्भात पाठपुरावा सुरु आहे   केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बाबत सकारात्मकता दर्शवली आहे आज त्यांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सदिच्छा भेट घेतली ..या भेटीदरम्यान त्यांनी पुन्हा खामगाव जालना रेल्वे मार्गाचा विषय चर्चाला असता रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top