dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अकोल्यात १३.८० लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त; एक जेरबंद : ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई | MD drugs worth Rs 13.80 lakh seized in Akola

MD drugs worth Rs 13.80 lakh seized in Akola : शहरातील अंमली पदार्थांच्या विरोधात राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने २०२६ मधील पहिली मोठी कारवाई करत तब्बल १३ लाख ८० हजार रुपयांचा एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केला आहे. 

अकोला : शहरातील अंमली पदार्थांच्या विरोधात राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने २०२६ मधील पहिली मोठी कारवाई करत तब्बल १३ लाख ८० हजार रुपयांचा एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केला आहे. या कारवाईत एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेतला असून शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन बसस्थानकाच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळ एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. या खात्रीलायक माहितीच्या आधारे पथकाने शासकीय पंचांसमक्ष सापळा रचला.

कारवाईदरम्यान मोहम्मद शफीक मोहम्मद जहिर शेख (वय ३५, रा. मुसा कसम चाल, एम.पी. रोड, अपोझिट आलीशन थिएटर, मुंब्रा, जि. ठाणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ६८.४३ ग्रॅम एमडी ड्रग्ज (Mephedrone Drug) ज्याची किंमत १३ लाख ६० हजार रुपये असून, दोन मोबाईल फोन (किंमत २० हजार रुपये) असा एकूण १३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, माजीद पठाण, गणेश पांडे (सीएमएस सेल) तसेच पोलीस अंमलदार शेख हसन, भास्कर धोत्रे, वसिमोद्दीन, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, किशोर सोनोने, एजाज अहमद, अन्सार अहमद, उदय शुक्ला, स्वप्नील चौधरी, अशोक सोनवणे, मनिष ठाकरे आणि रामसिकन डोईफोडे यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top