dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गांधेली फाटा परिसरात आढळला वकिलाचा मृतदेह; अज्ञाताने खून केल्याचा संशय

छत्रपती संभाजीनगर :  शहरातील बीड बायपास रोडवर गांधेली फाट्याच्या जवळ हायकोर्टातील एका वकिलाचा मृतदेह आढळून आला आहे. मिथुन भास्कर (४९ वर्ष ), रा. आनंदनगर, बीड बायपास असे मृत वकिलाचे नाव असल्याची माहिती एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली. 

छत्रपती संभाजीनगर :  शहरातील बीड बायपास रोडवर गांधेली फाट्याच्या जवळ हायकोर्टातील एका वकिलाचा मृतदेह आढळून आला आहे. मिथुन भास्कर (४९ वर्ष ), रा. आनंदनगर, बीड बायपास असे मृत वकिलाचे नाव असल्याची माहिती एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली. अज्ञात व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत पाचोळे, जगन्नाथ मेनकुदळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी मिथुन भास्कर यांच्या मांडीजवळ रक्तस्त्राव झालेला दिसला. पोलिसांनी तत्काळ त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. रात्री उशिरा सहाय्यक पोलिस आयुक्त भागीरथी पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनीदेखील घटनास्थळाची पाहणी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top