जालन्यात स्विफ्ट कार विहिरीत कोसळली; चौघांचा मृत्यू

अकोलदेव :  गेवराई गुंगी ता.फुलंब्री येथून सुलतानपूरला निघालेली स्विफ्ट कार एका तरुणाला वाचविण्याच्या प्रयत्नात ७० फूट पाणी असलेल्या विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर अन्य दोनजण गंभीर जखमी असून त्यांना कलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविले आहे. ही घटना आज सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील गाडेगाव शिवारात घडली.

ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे वय 55 रा. कोपर्डा तालुका भोकरदन, निर्मला सोपान डकले 25, रा. गेवराई गुंगी, ता. फुलंब्री,  ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले 40, रा. गेवराई गुंगी, ता. फुलंब्री पद्माबाई लक्ष्मण भांबिरे  55, रा. कोपर्डा ता. भोकरदन असे या घटनेतील मृतांची नावे आहे. तर

भगवान साळुबा बनकर रा.गाडेगवान हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मृतक निर्मला डकले यांना पॅरालिसिसचा आजार होता. त्या आजाराच्या उपचारासाठी ते गेवराई गुंगी या ठिकाणाहून सुलतानपूरकडे स्विफ्ट कारणे निघाले होते. गाडेगाव शिवारात सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पोलिस भरतीची तयारी करणारे काही तरुण धावत होते, यातील एकाला कारची धडक बसली. परंतु त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर कार विहिरीत कोसळल्याने हा अपघात घडला. मयत निर्मला यांचे आई वडील आणि दीराचा मृतांकामध्ये समावेश आहेत. त्यांचा मुलगा कैवल्य सोपान डकले याला सुद्धा ते सोबत घेऊन जात होते. परंतु त्याने शाळेत जाण्याचा आग्रह धरल्याने तो वाचला. अग्निशमन दल, पोलिस अजूनही घटनास्थळी असून गाडी अद्यापही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »