संग्रामपूर तालुक्यात दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार! 

संग्रामपुर :तालुक्यातील वरवट बकाल-एकलारा रोडवर २८ ऑगस्ट  रोजी सायंकाळी उशिरा दोन दुचाकींची  समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये  दोन युवकांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. 

संग्रामपुर :तालुक्यातील वरवट बकाल-एकलारा रोडवर २८ ऑगस्ट  रोजी सायंकाळी उशिरा दोन दुचाकींची  समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये  दोन युवकांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. 

  प्राप्त माहितीनुसार, अपघातात एक महिला आणि पाच युवकांचा समावेश होता. मृतांमध्ये गणेश हरिदास ढोले (रा. पाळोदी) व अजय लहासे (रा. बावनबीर) यांचा समावेश आहे. ज्या दुचाकीवर महिला बसली होती ती पाळोदी येथील रहिवासी असून, दुसरी दुचाकी बावनबीर येथील असल्याचे समजते. सदर महिला टुनकी येथे अंत्यविधीसाठी आलेल्या होत्या. अपघातानंतर जखमींना स्थानिकांच्या मदतीने तातडीने अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »