जालना : घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशयाच्या नदीपात्रातून रात्रीच्या वेळी अवैध वाळू उत्खनन केले जात आहे. दरम्यान, अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करून हे उत्खनन थांबवावे, अशी मागणी जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबतचे पत्र जालना तहसिलदार छाया पवार यांना मनगारपलिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या शहर अभियंत्यांनी दिले आहे. जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयातून अवैध वाळू उपसा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. घाणेवाडी जलाशयाच्या नदीपात्रातून काही अज्ञात लोक अवैधरित्या वाळू उपसा करत आहेत. त्यामुळे जालना तहसील कार्यालयाने ही बाब गांभीर्याने घेऊन घाणेवाडी जलाशय परिसरात रात्रीची गस्त वाढवावी आणि अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, असे निवेदन देण्यात आले आहे.