लाचखोर उपजिल्हाधिकारी खिरोळकरला १ जूनपर्यंत पोलिस कोठडी

छत्रपती संभाजीनगर : वर्ग दोनची जमीन वर्ग 1 करण्यासाठी पाच लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक आरोपी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दिलीप ञिभूवन या दोघांना 1 जूनपर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सञ न्यायाधीश एन.एम. जमादार यांनी बुधवारी 28 मे रोजी हे आदेश दिले.

छत्रपती संभाजीनगर : वर्ग दोनची जमीन वर्ग 1 करण्यासाठी पाच लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक आरोपी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दिलीप ञिभूवन या दोघांना 1 जूनपर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सञ न्यायाधीश एन.एम. जमादार यांनी बुधवारी 28 मे रोजी हे आदेश दिले.

तक्रारदाराने 2023 मध्ये मौजे तिसगाव येथील 6 एकर 16 गुंठे वर्ग 2 ची जमीन विकत घेतली होती. ही जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी आणि नजराणा भरण्यासाठी लागणाऱ्या चलनासाठी आरोपींनी आधी 23 लाख रूपये घेतले होते. पुढे त्यांनी 18 लाखांची लाच मागितली, त्यातील 5 लाख घेण्याच्या वेळी त्रिभुवन अडकला, आणि त्यानंतर खिरोळकरलाही अटक करण्यात आली. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान आरोपी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर याच्या घर झडतीत 13 लाख 6 हजार 380 रुपयांची रोख रक्कम, 50 लाख 99 हजार 583 रुपयांचे 589 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 3 लाख 39 हजार 345 रुपयांचे 3 किलो चांदीचे दागिने असा सुमारे 67 लाख 45 हजार 308 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

वरील दोघा आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी लोकाभियोक्ता नितीन धोंगडे यांनी आरोपींनी इतक्या मोठ्या प्रमाणात लाच मागितली. तीचे कोणाला वाटप करणार होते. आरोपींच्या आवाजाचे नमुन्यांचा पंचनामा करायचा आहे. आरोपी खिरोळकरयाच्या कार्यालयातील सीसीटीव्हीचे डीव्हीआर जप्त करण्यात आले असून त्या चिञणाबाबत त्यांच्याकडे चौकशी करायची आहे. आरोपीच्या घर झडतीतून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाला बाबत चौकशी करायची आहे. तसेच खिरोळकर याच्या कॅबीन मध्ये आढळलेल्या 75 हजारांच्या रोख रक्कमेबाबत तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »