श्री संत गजानन महाराज प्रकट दिन;  दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले

अनुप गवळी/ शेगांव :  श्रींच्या 147 व्या प्रगटदिनाच्या निमित्ताने राज्यासह देशभरातून श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी होणारी भाविक भक्तांची गर्दी लक्षात घेऊन भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने 19 व 20 फेब्रुवारी असे दोन दिवस श्रींचे मंदिर भाविक भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवले जाणार आहे. अशी माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

अनुप गवळी/ शेगांव :  श्रींच्या 147 व्या प्रगटदिनाच्या निमित्ताने राज्यासह देशभरातून श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी होणारी भाविक भक्तांची गर्दी लक्षात घेऊन भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने 19 व 20 फेब्रुवारी असे दोन दिवस श्रींचे मंदिर भाविक भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवले जाणार आहे. अशी माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

20 फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज प्रगटदिन असल्याने या दिवशी सकाळी 10 ते 12 हभप भरत बुवा पाटील म्हैसवाडी यांचे शेगावी श्रींच्या प्रगटदिनानिमित्त किर्तन होईल.20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता श्री महारूद्र स्वाहाकार यागाची पुर्णाहूती, अवभृतस्नान होईल. दुपारी 4 वाजता उत्सवांची पालखी अश्व, रथ, मेणासह परिक्रमा करीता निघेल 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 हभप श्रीराम बुवा ठाकरे लातूर यांचे काल्याचे किर्तन होईल व या प्रगटदिन उत्सावाची सांगता होणार आहे. श्री प्रगटदिन उत्सावात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, मध्येप्रदेश, या ठिकाणाहून भजनीदिंड्या दाखल होत आहे. शेकडो दिंड्यांचे आगमनाने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच श्री संस्थान कडून भक्तांच्या सोयीसाठी श्रींचे दर्शनसाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण मंडप, श्रींची गादी व पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार अल्पदरात राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता ही भक्तांना श्रींच्या प्रति आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे. भक्तांना कोणताही त्रास होवू नये. यास्तव श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत. या उत्सव काळात सर्वतोपरी सोयीसुविधा संस्थानच्यावतीने पुरविल्या जात आहेत.

संतनगरीत दोन दिवस महाप्रसाद वितरण

श्री गजानन सेवा समितीच्या वतीने श्रींचे प्रगटदिन उत्सवानिमित्त शहरात येणाऱ्या भजनी दिंडी व भाविक भक्तांसाठी बुधवार 19 फेब्रुवारी व गुरुवार 20 फेब्रुवारीला असे दोन दिवस अखंडपणे महाप्रसाद वितरण शहरातील श्री अग्रेसन भवन येथे सुरू राहणार आहे. तरी उत्सवासाठी येणाऱ्या भजनी दिंड्यांमधील वारकरी, भाविक भक्त व पंचक्रोशीतील भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री गजानन सेवा समिती शेगाव- नागपूर- अकोटचे वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »