Fire breaks out in Jalna: फ्रिजचा स्फोट झाल्याने घरात आग लागल्याची घटना सोमवारी,17 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास जालना शहरात घडली. सुदैवाने या स्फोटामुळे कोणतेही जीवितहानी झाली नाही.
जालना : फ्रिजचा स्फोट झाल्याने घरात आग लागल्याची घटना सोमवारी,17 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास जालना शहरात घडली. सुदैवाने या स्फोटामुळे कोणतेही जीवितहानी झाली नाही.
फ्रिजमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने फ्रिजचा अचानक स्फोट होऊन फ्रिजला ही आग लागली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसून घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. जुना जालना शहरातील शनी मंदिर भागातील विठ्ठला टॉवर्स येथे रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत घरातील संसार उपयोगी साहित्य आगीत जळून खाक झालं होते. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टेसह अग्निशमन कर्मचारी तसेच ॲम्बुलन्स चालक आनंद भोरे डॉ नदीम सर यांनी आग विझवण्यासाठी मदतकार्य केले.