School van accident in Wadegaon: विद्यार्थ्यांना शाळेत घेवून जाणाऱ्या स्कूल व्हॅनला विटांनी भरलेल्या ट्रकने जबर धडक दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळच्या सुमारास वाडेगाव नजीक पातुर-बाळापूर रोडवर घडली. अपघातात १० विद्यार्थी जखमी झाले असून तीन विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
अकोला : विद्यार्थ्यांना शाळेत घेवून जाणाऱ्या स्कूल व्हॅनला विटांनी भरलेल्या ट्रकने जबर धडक दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळच्या सुमारास वाडेगाव नजीक पातुर-बाळापूर रोडवर घडली. अपघातात १० विद्यार्थी जखमी झाले असून तीन विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत घेवून जाणाऱ्या स्कूल व्हॅनला वाडेगाव नजीक पातुर- बाळापूर मार्गावर विटांनी भरलेल्या ट्रकने जबर धडक दिली. या धडकेत स्कूल व्हॅनचा समोरील भाग क्षतीग्रस्त झाला असून व्हॅनमध्ये बसलेले दहा विद्यार्थी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह पालकांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांनी व्हॅनमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, यातील तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे दिसताच त्यांना तत्काळ अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले.
संतप्त पालकांचा रास्का रोको
अपघातानंतर संतप्त नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. वाडेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वर्दळ राहत असल्याने या ठिकाणी अपघाताच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यात यावा, तसेच वाहतूक पोलिस कार्यरत करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.