Hair loss case in Shegaon: रेशनच्या गव्हामध्ये वाढलेले सिलेनियमचे प्रमाण शेगाव तालुक्यातील केसगळती प्रकारासाठी कारणीभूत ठरल्याचा निष्कर्ष पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी संशोधननातून जाहीर केला. याबाबतची तपासणी शासनमान्य प्रयोग शाळेत केली आहे. मात्र, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गव्हातील सेलेनियममुळे केस गळती होत नाही अशी खोटी माहिती सभागृहाला दिली, त्यामुळे दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात हक्कभंग कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी विधानपरिषदेचे आमदार धिरज लिंगाडे यांनी केली आहे.
बुलढाणा : रेशनच्या गव्हामध्ये वाढलेले सिलेनियमचे प्रमाण शेगाव तालुक्यातील केसगळती प्रकारासाठी कारणीभूत ठरल्याचा निष्कर्ष पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी संशोधननातून जाहीर केला. याबाबतची तपासणी शासनमान्य प्रयोग शाळेत केली आहे. मात्र, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गव्हातील सेलेनियममुळे केस गळती होत नाही अशी खोटी माहिती सभागृहाला दिली, त्यामुळे दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात हक्कभंग कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी विधानपरिषदेचे आमदार धिरज लिंगाडे यांनी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील केसगळती प्रकरणावर विधानपरिषदेमध्ये २० मार्च रोजी चर्चा झाली. यामध्ये, गव्हातील सेलेनियममुळे केस गळती होत नाही अशी खोटी माहिती आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिल्याचे विधानपरिषदेचे आमदार धिरज लिंगाडे यांनी सांगितले. चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळे, बोर्डिकर यांच्या विरोधात हक्कभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लिंगाडे यांनी केली.
गव्हातील सिलेनियमचे प्रमाण वाढले!
केसगळतीने बाधित झालेल्या नागरिकांचे केस, रक्ताच्या चाचण्या तसेच गहू, पाणी, माती परिक्षणासाठी आयसीएमआरकडे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. व आयसीएमआर कडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर उपाययोजना केल्या जातील असे म्हटले आहे. यावर अनेक खाजगी संशोधक आणि संस्था यांनी केलेल्या संशोधनात या गावातील आहारात आलेल्या रेशनच्या गव्हामध्ये सेलेनियमचे प्रमाण हे १४.५२ पीपीएम इतके जास्त असल्याचा निष्कर्ष काढून जाहिर केला आहे. याबाबतची तपासणी शासनमान्य प्रयोग शाळेत केलेली आहे. वस्तुतः गव्हामध्ये सिलेनियमचे प्रमाण हे ०.१ ते १.९ पीपीएम असले पाहिजे. असे असताना आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर खोटी माहिती दिल्याचे लिगांडे यांचे म्हणणे आहे.
शेगांव तालुक्यातील १८ गावांमध्ये ‘टक्कल व्हायरस’
बुलढाणा जिल्हयातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा वैजनाथ, घुई व इतर १८ गावांमध्ये केस गळती चे प्रकरण घडले. गावातील लोकांना डोक्याला आधी खाज येते, त्यानंतर हळूहळू केस गळू लागतात आणि तीन दिवसातच संपूर्ण टक्कल पडत आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दाढीचेही केस गळत असल्याने गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.