शेगाव शहरातील हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा: 60 जण ताब्यात; एक कोटीचा मुद्देमाल जप्त

शेगाव : शेगाव शहरात एका रिसॉर्ट मध्ये छुप्या मार्गाने सुरू असलेल्या हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर अपर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने छापा मारून तब्बल सात जुगार यांना ताब्यात घेऊन सतरा लाख रुपये नगदसह दहा महागड्या गाड्या असा एकूण एक कोटीपर्यंतचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई 1 नोव्हेंबर च्या मध्यरात्री करण्यात आली या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे. 

             मागील अनेक दिवसापासून शेगाव शहरातील खामगाव शेगाव मार्गावरील आदर्श रिसॉर्टवर उच्चभ्रू नागरिकांकडून जुगार खेळल्या जात असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या पथकाला मिळाली. यावेळी पथकाने मागील काही दिवसापासून सदर रिसॉर्टवर लक्ष केंद्रित केले होते. दरम्यान एक नोव्हेंबरच्या मध्यरात्री रिसॉर्टवर मोठ्या प्रमाणात बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांकडून हॉटेलमध्ये जुगाराचा डाव खेळल्या जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने सदर रिसॉर्टवर छापा मारला. दरम्यान या छाप्यामध्ये पोलिसांनी एकूण 60 व्यक्तींना जुगार खेळताना ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्यांचे जवळून नगद 17 लाख रुपये तसेच महागड्या दहा वाहने किंमत अंदाजे 80 लक्ष रुपये तसेच इतर मुद्देमालासह एकूण 1 कोटींच्या जवळपासचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी मुद्देमाला सह सर्व वाहने ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशन मध्ये लावल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. सदर कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील खामगाव व शेगाव पोलिसांनी संयुक्तरीत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »