सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसराला अवकाळी पावसाने रविवार, 2 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा तडाखा दिला. पावसाचे पाणी शेतात साचल्याने कपाशी, मका, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले. शासनाने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाचे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांनी केली आहे. दरम्यान, सावळदबारा येथील नामदेव ठोसर यांच्या दोन मजली घराच्या छतावर वीज कोसळल्याने घराचे नुकसान झाले.

सप्टेंबर आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या अवकाळी पावसाने सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसराला जोरदार तडाखा दिला आहे. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानकपणे मेघगर्जनेसह आलेल्या अवकाळी पावसाने सावळदबारासह डाभा, नांदातांडा, घाणेगाव, मोलखेडा, टिटवी, पळसखेडा, हिवरी, देव्हारी, मूर्ती, पिपळवाडी, महालब्धा, रवळा, जवळा, पिपळा, जामठी आदी परिसरात जोरदार हजेरी लावली. जोरदार पावसामुळे कपाशी, मका, सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सावळदबारा येथील नामदेव ठोसर यांच्या दोन मजली घराच्या छतावर वीज कोसळल्याने घराचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.