One stabbed to death in Chhatrapati Sambhajinagar: शहरातील उस्मानपुरा परिसरात पहाटे पाच वाजे दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे,एकाने चाकू काढत थेट एका चाळीस वर्षे इसमाच्या मानेवर वार करत त्याला ठार केले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील उस्मानपुरा परिसरात पहाटे पाच वाजे दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे,एकाने चाकू काढत थेट एका चाळीस वर्षे इसमाच्या मानेवर वार करत त्याला ठार केले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे. दारुमुळे हा खून झाल्याचा संशय आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत असून अशोक दादाराव शिनगारे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. निखिन शिंगाडे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. उस्मानपुरा पोलिसांनी आरोपी निखिल याला अटक केली असुन पुढील तपास पोलीस करत आहेत.