नवी दिल्ली : दहशतवादाविरुद्ध भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरला “न्यायाप्रती अढळ प्रतिबद्धता” असे वर्णन करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले की आज प्रत्येक दहशतवादी आणि दहशतवादी संघटनाला आपल्या माता आणि मुलींच्या कपाळावरील सिंदूर पुसण्याचे परिणाम काय होतात हे माहित आहे. एक दिवस पाकिस्तान समाप्त होईल, सध्याची शस्त्रसंधी म्हणजे कारवाई तात्पुरती स्थगित केली आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला.

ऑपरेशन सिंदूरनंतर 12 मे रोजी रात्री 8 वाजता पहिल्यांदाच देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शूर सशस्त्र दल, सैनिक, शास्त्रज्ञ आणि गुप्तचर संस्थांना सलाम केला. ते म्हणाले की, २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये जे काही घडले त्याने देश आणि संपूर्ण जगाला हादरवून टाकले. त्यांनी सांगितले की, देशातील निष्पाप नागरिकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसमोर क्रूरपणे मारण्यात आले. मोदी म्हणाले की त्यांच्यासाठी हे वैयक्तिकरित्या खूप मोठे दुःख होते. ते म्हणाले की, या घटनेनंतर संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध उभा राहिला. सशस्त्र दलांचे हे शौर्य मी या देशातील माता, बहिणी आणि मुलींना समर्पित करतो. पहलगाम घटनेत दहशतवादाचा ‘कुरूप चेहरा’ उघड झाला. आम्ही आमच्या सशस्त्र दलांना दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. पंतप्रधान म्हणाले की, आज प्रत्येक दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांना हे चांगलेच माहित आहे की, आपल्या माता आणि मुलींच्या कपाळावरील सिंदूर पुसल्याने काय परिणाम होतो? ऑपरेशन सिंदूर ही न्यायाप्रती असलेली अखंड वचनबद्धता आहे. देशाने आणि जगाने ही अखंड प्रतिज्ञा पाहिली असल्याचे मोदी म्हणाले.
रक्त आणि पाणी एकत्र वाहत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पाकिस्तानला जर वाचायचे असेल तर त्याला दहशतवाद नष्ट करावाच लागेल. त्याशिवाय शांततेचा कोणताही मार्ग नाही. भारताचा हेतू एकदम स्पष्ट आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाही. शिवाय पाणी आणि रक्तही एकत्र नाही वाहू शकत.