दुबई : टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने हरवले. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सलग दुसरा विजय मिळवला आहे.

दुबई : टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने हरवले. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सलग दुसरा विजय मिळवला आहे.
टीम इंडियाने यूएईनंतर 14 सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान ३ विकेट्स गमावून पूर्ण केलं. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोघांनी भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. आशिया कपच्या सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला. संघाने १६ व्या षटकात ३ विकेट्स गमावून १२८ धावांचे लक्ष्य गाठले. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ९ विकेट्स गमावून १२७ धावा केल्या.