छत्रपती संभाजीनगर : भालगाव शिवारात असलेल्या एका गोडाऊनला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. गोडाऊनला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवार, 14 जुलै रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चार ते पाच तासात आगीवर नियंत्रण मिळवले असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी दिली आहे.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भालगाव शिवारातील गट नंबर 342 मध्ये तिरुपती इंटरप्रायजेस नावाचे पन्नी गोडाऊन आहे. मंगळवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास गोडाऊनला अचानकपणे आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण करीत गोडाऊनला आपल्या कावेत घेतले. गोडाऊनला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलास मिळाल्यावर मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा अग्निशमन केंद्राचे उपअग्निशमन केंद्र अधिकारी विनायक कदम, डयुटी अधिकारी सोमीनाथ भोसले, अग्निशामक जवान अनिकेत लांडगे, लालचंद दुबिले, राजू राठोड, प्रमोद पवार, रतन बहुरे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीशी जवळपास चार ते पाच झुंज देत आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची नोंद चिकलठाणा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. गोडाऊनला आग कशामुळे लागली याचे कारण समजू न शकल्याचे अग्निशमन अधिकारी खांडेकर यांनी सांगितले.