dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शेतकरी पिता पुत्राची स्वतःच्या शेतातील कांदा चाळीत गळफास घेऊन आत्महत्या 

खामगाव :  खामगाव तालुक्यातील पारखेड येथे अत्यंत हृदयद्रावक घटना रविवार दि.१९ जुलै रोजी रात्री ८ वाजता घडली असून, वडील आणि मुलाने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मृतांची नावे संतोष गावंडे (वय 52) आणि त्यांचा मुलगा अक्षय गावंडे (वय 28) अशी आहेत. दोघेही शेती व्यवसाय करत होते. रविवारी रात्री ८ वाजता  स्वतःच्या शेतात कांदा चाळ च्या अँगल ला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच खामगाव  ग्रामीण पोलीस स्टेशन, घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे पारखेड गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top