Export ban on onion lifted:कांद्यावरील निर्यातबंदी हटवली, पण निर्यात शुल्क लागू

Export ban on onion lifted

Export ban on onion lifted: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. परदेशी व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या एका अधिसूचनेत म्हटले आहे की १ मेट्रिक टन कांदा निर्यातीसाठी ५५० डॉलर्स किमान मुल्य निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल की नाही? याबाबत संभ्रम आहे.

Export ban on onion lifted
Export ban on onion lifted

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. परदेशी व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या एका अधिसूचनेत म्हटले आहे की १ मेट्रिक टन कांदा निर्यातीसाठी ५५० डॉलर्स किमान मुल्य निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल की नाही? याबाबत संभ्रम आहे.
कांद्याच्या निर्यातीसंदर्भात केंद्र सरकारने पुन्ह मोठा निर्णय घेतला. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी हटवली आहे. एकीकडे निर्यातबंदी हटवली असली तरी, दुसरीकडे 550 डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे. निर्यात शुल्क आकारल्यामुळे देशात कांद्याच्या किंमती वाढणार नाहीत, याची दक्षता सरकारने घेतल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचा नवा निर्णय

कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे. मात्र, 550 डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य ठेवण्यात आले आहे. या निर्यात मूल्याने कांद्याची निर्यात करणे शक्य होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने 7 डिसेंबर 2023 ला निर्यातबंदी लागू करण्यात आल्याने याचा मोठा फटका शेतकरी आणि निर्यातदारांना बसत होता. यानंतर एनसीईएलच्या माध्यमातून काही देशात निर्यात सुरू करण्यात आली होती. मात्र याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. अखेर शुक्रवारी रात्री केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हा नवा निर्णय घेतला. या निर्णयाचे निर्यातदारांनी स्वागत केले असून, यामुळे शेतकऱ्यांनाही निश्चित फायदा होणार असल्याच त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »