Chhatrapati Sambhajinagar Assembly: भाजपाच्या सुरेश बनकरांच्या हाती शिवबंधन; सिल्लोडमध्ये मंत्री सत्तारांना देणार टक्कर!

Chhatrapati Sambhajinagar Assembly

Chhatrapati Sambhajinagar Assembly :  भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते सुरेश बनकर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल झाले आहेत. शनिवारी त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे त्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले.

Chhatrapati Sambhajinagar Assembly

छत्रपती संभाजीनगर :  भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते सुरेश बनकर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल झाले आहेत. शनिवारी त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे त्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांना विधानसभा निवडणुकीत टक्कर देणार आहेत.

२०१९ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने अब्दुल सत्तार यांना सिलोड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळू नये साठी बनकर यांनी जाहीर विरोध केला होता. त्यानंतर सत्तार यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. अडीच वर्षांपूर्वी त्याच सत्तारानी शिंदेसेना जवळ करून मंत्रीपद भूषवले. २०२४ च्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे चित्र मराठा आणि ओबीसी केंद्रित मतदारांभोवती फिरताना दिसत आहे. त्यामुळे मध्यंतरी सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या मित्र रावसाहेब दानवे यांच्याशी बिनासल्याचे वारंवार दाखवले. सिल्लोड विधानसभा मतदारसंघ मराठा, मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असलेला मतदार संघ आहे. त्यात आता सुरेश बनकर यांनी भाजपाततून शिवसेनेत प्रवेश केल्याने ही निवडणूक उध्दव सेना विरुध्द शिंदे सेना अशी चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठा मतदार दाखवू शकतात एकी

मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तिवृता असलेल्या जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्हा मानला जातो. लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यात मराठा मतदारांचा प्रभाव दिसून आला. जालना लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकिटावर उभे असलेल्या डॉ. कल्याण काळे यांना सिल्लोड विधानसभा मतदार संघातून आघाडी होती. त्यामुळे आता जरांगे यांच्या आंदोलनाने प्रभावित असलेल्या मराठा मतदारांकडून नक्कीच बनकर यांना पसंती मिळू शकते. प्रत्येक निवडणुकीत सत्तार विरोधात तुल्यबळ उमेदवार नसल्याने ते हमखास विजयी व्हायचे मात्र यावेळी मराठा मतदारांनी एकी दाखवली तर चित्र वेगळे असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »