Teachers protest in Mumbai : विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वाढीव अनुदानासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर ५ जून पासुन धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षकांनी केले आहे.
बुलढाणा : विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वाढीव अनुदानासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर ५ जून पासुन धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षकांनी केले आहे.
एपिसी बैठक होण्यापूर्वी शिक्षकांच्या वाढीव अनुदानाचा प्रश्न मार्गी लागावा, असे आंदोलक शिक्षकांचे म्हणणे असून, न्याय हक्काच्या प्रश्नासाठी मुंबई येथे होत असलेल्या आंदोलनामध्ये ठामपणे हजर राहण्याचे आवाहन रहाटे, नितीन वाढे, विजय नारखडे, आशिष चरखे, पवार, प्रा. कडुकार, मिसाळ, सुनील देशमुख, मखमले, बोंद्रे, प्रा. किलबीले, प्रतापसिंग वायाळ यांनी केले आहे. वाढीव अनुदानासाठी (अधिक अनुदान) सुरू असलेले आंदोलन राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विना-अनुदानित, तसेच अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी एकत्रितपणे केले आहे. या आंदोलनात हजारो शिक्षक सहभागी झाले आहेत.