अंबड : शहरातील श्री मत्स्योदरी देवी मंदिराजवळील पाच पिंपळचा जंगी तलाव मे महिन्यात पडलेल्या अवकाळी बेमोसमी पावसामुळे तुडुंब भरला आहे. या जंगी तलावात टाकलेल्या मत्स्यबीजामुळे मत्स्यव्यवसाय होणार होता. मात्र, शुक्रवार, 6 जून रोजी तलावातील ७ ते ८ टन मासे मृत पावल्याने ५ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तलावाचे ठेकेदार व तलाव रक्षक असद पठाण यांनी सांगितले.

अंबड शहरातील या जंगी तलावाच्या काठावर मृत माशांचा ढिगारा पडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. माशांच्या मृत्यूचे खरे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र पाणी दूषित झाले. वातावरणाचा विपरीत परिणाम झाला की, दुसरे काही कारण घडले हे तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. मागील वर्षी देखील अशाच प्रकारे माशांचा तडफडून मृत्यू झाला होता. यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. या तलावाचा ठेका दोन वर्षासाठी एम.पी. इंटर प्राईजेसने १२ लाख रुपयात अंबड नगर पालिकेकडून घेतला आहे.
उत्पन्न बुडाले
शहरातील जंगी तलावामध्ये मत्स्यबीज टाकून चांगले उत्पन्न मिळेल,अशी आशा होती. मात्र उत्पन्न तर सोडाच माशांचा मृत्यू झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. तलावात ७ ते ८ टन मासे मृत पावल्याने ५ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
– असद पठाण, मत्स्य तलाव रक्षक, अंबड