attack a person with a weapon on Jalna Road : शहरातील गजबजलेल्या जालना रस्त्यावर एका तरुणावर काही गुंडांनी शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या घटनेचे फोटो काढणाऱ्या पत्रकरालाही या तोक्याने जखमी केले. ही घटना गुरुवारी दि.२६ रोजी वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर घडली. दरम्यान सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील गजबजलेल्या जालना रस्त्यावर एका तरुणावर काही गुंडांनी शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या घटनेचे फोटो काढणाऱ्या पत्रकरालाही या तोक्याने जखमी केले. ही घटना गुरुवारी दि.२६ रोजी वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर घडली. दरम्यान सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या जालना रस्त्यावर सिडको परिसरात वसंतराव नाईक महाविद्यालय आहे. या ठिकाणी गुरुवारी दुपारी तीन ते चार च्या सुमारास काही गुंडांनी हैदोस घातला. त्यांनी शस्त्रासह लोखंडी रॉडने आणि लाटाकाठ्यांनी तरुणावर हल्ला चढवला होता. हा सर्व प्रकार सुरू असताना रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. दरम्यान अजय हरणे नामक माध्यम प्रतिनिधीने या घटनेचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही या गुंडांनी मारहाण केली. मोबाईल हिसकावून तो फोडण्यात आला. त्यानंतर हातातल्या शस्त्रांनी हरणे यांच्या दुचाकीचे नुकसान करण्यात आले. जखमी हरणे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . याच वेळी या घटनेतील आणखी एक जखमी तरुण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला. या सर्व प्रकारानंतर अजय यांच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरवासी मध्ये कोयता गॅंगची दहशत
शहरातील विविध भागांमध्ये भर दिवसा कोयता गॅंग दहशत माजवत आहे. शिल्लक कारणांमधून दोन गटात थेट हिंसक भांडण होताना दिसत आहे. यामध्ये बहुतांशी वेळी जखमी अवस्थेत रस्त्याने धावणारी तरुण पाहायला मिळत असल्याने सर्वसामान्य शहरवासी मध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. मागील अनेक दिवसापासून असे प्रकार घडत असून पोलीस प्रशासनाने दहशत माजविणाऱ्या गुंडांच्या नुसत्या आवळाव्यात अशी मागणी होत आहे.