एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा एल्गार; मानोरा तहसीलवर मोर्चा 

मानोरा :  बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करून त्यांना आरक्षण मिळावे, यासाठी १७ सप्टेंबर रोजी  मानोरा तालुक्यातील सकल बंजारा समाजाने क्रांतिकारी संत सेवालाल महाराज चौकातून सुरू केलेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात सहभागी बांधवांनी तहसीलदार यांच्यामार्फत      मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आले.

मानोरा :  बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करून त्यांना आरक्षण मिळावे, यासाठी १७ सप्टेंबर रोजी  मानोरा तालुक्यातील सकल बंजारा समाजाने क्रांतिकारी संत सेवालाल महाराज चौकातून सुरू केलेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात सहभागी बांधवांनी तहसीलदार यांच्यामार्फत      मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आले.

ऐतिहासिक दृष्ट्या बंजारा समाज मूळ आदिवासी असून हैदराबाद गॅझेटच्या नोंदी प्रमाणित आहेत. या नोंदी जिल्हा गॅझेट महसूल रेकॉर्डमध्ये स्पष्टपणे उपलब्ध आहेत, जे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यास पुरावे पुरवतात. त्यामुळे समाजाच्या आरक्षणाची मागणी ऐतिहासिक व कायदेशीर दृष्ट्या योग्य असल्याचे बंजारा समाजाचे म्हणणे आहे.  शेकडो जेष्ठ नागरिक, युवक आणि महिला  मोर्चात सहभागी झाले होते.  मोर्चा शहरातील संत सेवालाल महाराज चौकातून सुरू झाला आणि तहसील कार्यालयावर पोहोचला. या आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित एल्गार मोर्चात हजारो बंजारा समाजाच्या बांधवांनी उपस्थिती लावली. मोर्चाला गोरसेना, गोर शिकवाडी, वसंत सेना, राष्ट्रीय बंजारा परिषद यांसह इतर बंजारा समाजाच्या संघटनांचे पदाधिकारी देखील आवर्जून सहभागी झाले.  मोर्चाच्या दिवशी आठवडी बाजार असल्यामुळे पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, तर मोर्च्यात सहभागी नागरिकांनी शांततापूर्ण मार्गाने आपली मागणी मांडली. मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यावर तहसीलदारांनी मोर्चा प्रतिनिधींना निवेदन स्वीकारून उच्च अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.  बंजारा समाजाच्या या आरक्षण मागणीसाठी सुरु झालेल्या प्रयत्नांमध्ये समाजाच्या एकात्मतेवर भर दिला जात असून, सामाजिक न्याय आणि समानतेसाठी नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मोर्चातील वक्त्यांनी सांगितले.

घोषणांनी दणाणले  शहर

मानोरा शहरात बुधवारी सकल बंजारा समाजाचा ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा शहरात मोठ्या उत्साहाने काढण्यात आला आणि शिरा समवेत तालुक्यातील हजारो समाज बांधव सहभागी झाले. मोर्चात सहभागी नागरिकांनी विविध घोषणांनी शहर दणाणून टाकले. त्यांनी ‘संत सेवालाल महाराज की जय!’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे!’, ‘बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण मिळालेच पाहिजे!’ अशा घोषणांमधून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »