dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शिक्षक आमदाराच्या वाहनाने युवकाला उडवले; चिखली येथील घटना; युवक गंभीर जखमी !

चिखली : अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या वाहनाने युवकाला उडवल्याची घटना चिखली शहरात गुरुवारी सकाळी घडली. या अपघातात युवक गंभीर जखमी झाला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चिखली पोलीस स्टेशनला सुरू आहे.

चिखली : अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या वाहनाने युवकाला उडवल्याची घटना चिखली शहरात गुरुवारी सकाळी घडली. या अपघातात युवक गंभीर जखमी झाला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चिखली पोलीस स्टेशनला सुरू आहे.

अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक (रा. वाशिम) यांच्या इनोव्हा गाडीने पायी जाणाऱ्या कृष्णा नंदू लष्कर (वय 25, रा. गौरक्षण वाडी चिखली) या तरुणास चिखली येथील पानगोळे हॉस्पिटलसमोर उडवले. गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. घडलेल्या या भीषण अपघातात कृष्णा गंभीर जखमी होऊन सध्या कोमात गेला आहे. त्याला तातडीने जवंजाळ हॉस्पिटल, बुलढाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेच्या वेळी आमदार किरण सरनाईक हे बुलढाण्यातील डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी जात होते. घटनेनंतर आमदार सरनाईक यांनी स्वतः जखमी युवकास गाडीत टाकून जवंजाळ हॉस्पिटल येथे दाखल केले, मात्र या अपघातामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

नागरिकांनी अशा घटना रोखण्यासाठी आमदार व अधिकाऱ्यांनी गाड्यांचा वेग मर्यादित ठेवावा आणि अपघात ग्रस्तांसाठी जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी केली आहे. या अपघात प्रकरणी चिखली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणेदार संग्राम पाटील यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top