क्रूरपणे गोवंशाची वाहतूक ; एक गाय दगावली! 

डोणगाव  : गोवंशीय जनांवरांची क्रूरपणे वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी डोणगावात उघडकीस आला असून,यापैकी एक गाय मृत अवस्थेत आढळून आली. 

डोणगाव  : गोवंशीय जनांवरांची क्रूरपणे वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी डोणगावात उघडकीस आला असून,यापैकी एक गाय मृत अवस्थेत आढळून आली. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास शिवाजी शाळेसमोर क्रृष्णा बकाल हे उभे असताना एक आयशर (क्र. एमएच. 19 सीवाय 7931) मध्ये १५ जनावरे क्रृरपणे नेत असल्याचे निदर्शनास आले. कृष्णा बकाल यांनी सदर वाहन थांबवुन डोणगांव पोलिसांना माहिती दिली. यानंतर, पोलिसांनी सदरचे वाहन ताब्यात घेतले. प्राप्त तक्रारीवरुन, गोवंशाची वाहतूक करणारे विजय भागचंद मान (45 वर्ष, रा.  मालेगाव, जि. नाशिक), हजु बबजु चव्हाण (25 वर्ष, रा. धानोरी ता.  पुसद जि यवतमाळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. 

54.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

1.45 लाख रुपये किमतीची गोवंशीय जणावरे, 40 लाख रुपयांचे आयशर वाहन असा एकुण ५४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, एक लाल रंगाचे  शिंगे असलेली गाय ही मृत अवस्थेमध्ये आढळली. प्रकरणाचा पुढील तपास  सहाय्यक फौजदार मंगेश खडसे करीत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »