Murder in Nandura: क्षुल्लक कारणावरून 21 वषीय पुतण्याने त्याच्या सख्ख्या काकावर कुऱ्हाडीने वार करून निघृण हत्या केल्याची घटना नांदुरा तालुक्यातील सोनज इसबपुर येथे 29 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता दरम्यान घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नांदुरा : क्षुल्लक कारणावरून 21 वषीय पुतण्याने त्याच्या सख्ख्या काकावर कुऱ्हाडीने वार करून निघृण हत्या केल्याची घटना नांदुरा तालुक्यातील सोनज इसबपुर येथे 29 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता दरम्यान घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करत खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी पुतण्यास ताब्यात घेतले आहे.
गुढीपाड्यावापासून शेतीच्या कामांची लगबग सुरू होणार आहे. अनेक शेतकरी शेती कसण्यासाठी राबतांना दिसून येत आहे. दरम्यान नांदुरा तालुक्यातील सोनज इसबपुर येथील शेतकरी गोपाल मनोहर बोके (45) रा. सोनज इसबपुर यांनीही त्यांच्या शेतामध्ये आगामी पिके घेण्यासाठी मशागतीच्या कामाला सुरूवात केली आहे. दरम्यान त्यांनी शेतात कामासाठी आणि खत वाहणीसाठी गावातील दुसऱ्या एका व्यक्तिचे ट्रॅक्टर सांगितले होते. पंरतु त्यांच्या सख्खा पुतण्या व आरोपी शुभम विठ्ठल बोके (30) याचेजवळही ट्रॅक्टर होते. त्यामुळे काकाने माझे ट्रॅक्टर कामाला न सांगता दुसऱ्याचे ट्रॅक्टर घेतल्याचा राग आरोपी शुभम बोकेच्या मनात होते. यावरून आरोपी शुभम बोके याने 29 मार्च रोजी गोपाल मनोहर बोके हे त्यांच्या पत्नी आणि मुलासह घरात हजर असतांना सकाळी 9.30 वाजता घरासमोर येवून शिवीगाळ केली. व शेती कामासाठी माझे ट्रॅक्टर का नाही सांगितले. असे म्हणून त्यांच्यावर कुऱ्हाडीने मानेवर आणि छातीवर वार करून त्यांची हत्या केली. या घटनेने संपूर्ण इसबपुर गावात खळबळ उडाली. झालेल्या घटनेमुळे मृतक गोपाल बोके यांचा मुलगा आणि पत्नी खूपच घाबरून गेले होते. त्यांनी तातडीने नांदुरा पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा केला. तसेच याप्रकरणी मृतकाचा विश्वजीत गोपाल बोके याच्या तक्रारीवरून आरोपी शुभम बोकेविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून तातडीने त्याला अटक केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक विलास पाटील हे करीत आहेत.