dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वाशिममध्ये निवडणूक मोड ऑन! चेकपोस्टवर वाहनांची  कसून चौकशी

वाशिम :  नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार पुन्हा एकदा रंगात आला असून, त्यासोबतच प्रशासकीय यंत्रणाही पूर्णपणे सज्ज झाली आहे. निवडणूक प्रक्रियेतील संवेदनशील टप्पा जवळ येत असताना एसएसटी पथकांना विशेष सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार  मराठवाडयातून वाशिम शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची  तोंडगाव येथील चेकपोस्टवर  १२ डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास कसून तपासणी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

निवडणुकीला तात्पुरती स्थगिती मिळाल्यानंतर २० डिसेंबर रोजी नव्याने मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली. निवडणूक पुढे ढकलूनही चेकपोस्टवरील तपासणी प्रक्रिया कायम ठेवण्यात आली होती. मात्र, प्रचाराला पुन्हा परवानगी मिळताच या तपासणीत अधिक कडकपणे काम सुरू झाल्याचे दिसून येत आहे. शहरात येणारी-जाणारी प्रत्येक चारचाकी व इतर वाहनांची नोंद घेऊन पथकांकडून कागदपत्रांची पडताळणी, डिक्की तपासणी आणि चालकांची विचारपूस करण्यात येत होती.  प्रशासकीय सूत्रांच्या मते, निवडणूक काळात अनधिकृत रोख रक्कम, मद्य वा प्रतिबंधित साहित्याची देवाणघेवाण रोखण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच, २० डिसेंबरच्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले असताना यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, शहराच्या प्रवेशद्वारांवर सुरक्षेची कडी घट्ट केल्याचे स्पष्टपणे जाणवते आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top