dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Highway jam in Washim : वाशिममध्ये हायवे जाम! एनएच-१६१ वर वाहनांची प्रचंड कोंडी

Highway jam in Washim : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर सुरू असलेल्या कामांमुळे १२ डिसेंबर रोजी सायंकाळी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. पुसद नाका ते हिंगोली रोडवरील रेल्वे उड्डाणपुलादरम्यान एक बाजू सिमेंट काँक्रीटीकरणासाठी बंद ठेवण्यात आली आहे.

Highway jam in Washim

वाशिम : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर सुरू असलेल्या कामांमुळे १२ डिसेंबर रोजी सायंकाळी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. पुसद नाका ते हिंगोली रोडवरील रेल्वे उड्डाणपुलादरम्यान एक बाजू सिमेंट काँक्रीटीकरणासाठी बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी संपूर्ण वाहतूक एका बाजूनेच सुरू असल्याने या मार्गावर वारंवार कोंडीची परिस्थिती निर्माण होते.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हिंगोली नाका ते पुसद नाका या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अवजड वाहनांना या मार्गावरून वाहतूक बंद करण्याच्या सूचना असल्या तरीही अनेक वाहने या मार्गावरूनच येत असल्याने कोंडी अधिकच वाढताना दिसली. संथ गतीने सुरू असलेले रस्त्याचे काम आणि अपुऱ्या पर्यायी वाहतूक व्यवस्थेमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक शाखेने काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असली तरी रस्त्याची उपलब्धता कमी असल्याने परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. नागरिकांनी संबंधित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी सातत्याने पुढे मांडली असून, कामाचा वेग वाढवून वाहतुकीची समस्या तातडीने सोडवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top