Prataprao Jadhav appointed as Union Minister : प्रतापराव जाधव यांची केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रीपदी वर्णी

प्रतापराव जाधव

Prataprao Jadhav appointed as Union Minister : केंद्रीय मंत्र्यांचे खातेवाटप आज सायंकाळी झालं. यामध्ये प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष्य मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्य मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला आहे.

प्रतापराव जाधव
प्रतापराव जाधव यांना सदिच्छा पर आशीर्वाद देताना रविशंकरजी व उपस्थित त्यांचे कुटुंबिय.

बुलढाणा :  केंद्रीय मंत्र्यांचे खातेवाटप आज सायंकाळी झालं. यामध्ये प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष्य मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्य मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला आहे.

आयुष्य आणि आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी अध्यात्मिक गुरु योगाचार्य श्री श्री श्री रविशंकर यांची सहकुटुंब जाऊन भेट घेतली. आणि रविशंकरजी यांचे आशीर्वाद घेतले. देशातील जनतेची आरोग्य सेवा करून लोकाभिमुख कार्य करा, अशा सदिच्छा पर आशीर्वाद रविशंकरजी यांनी प्रतापराव जाधव यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी राजश्री जाधव, जवाई सोहम वायाळ, मुलगी नम्रता सोहम वायाळ, मयुरी ऋषिकेश जाधव, त्यांचे स्वीय सहायक डॉ. गोपाल डिके, राहुल सोळंकी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

देशातील जनतेच आरोग्य जपण्याला प्राथमिकता देऊ: प्रतापराव जाधव

देशातील प्रत्येक नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याला आपण प्राथमिकता देणार असून गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात काम करणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय आयुष आणि आरोग्य कुटुंब कल्याण स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »