dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

ग्राहकाने स्वतः जागरूक होऊन आपल्या हक्काचे संरक्षण करावे; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर :  बाजारपेठेत मिळणाऱ्या विविध वस्तू, उत्पादने याची गुणवत्ता, किंमत आणि दर्जेदारपणा याबाबतच्या नोंदी पाहूनच ग्राहकाने वस्तूंची आणि उत्पादनाची खरेदी करावी. ग्राहक म्हणून आपण आपल्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी जागरूक राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवार, 17 मार्च रोजी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त कार्यक्रमाचे जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील,  वजने व मापे विभागाचे शिवाजी मुंडे, ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य राजेश मेहता, संगीता धारूरकर, धनंजय मुळे, नानक वेदी, अशोक ठोंबरे ,शेख अनवर शेख कौसर यांच्याससह पोलीस प्रशासन, परिवहन विभाग, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ग्राहकानी विविध उत्पादन खरेदी करून होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकाने स्वतः उत्पादन किंवा वस्तू याबाबतची खातरजमा करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर झालेल्या फसवणुकीबाबत ग्राहक न्यायालयात दाद मागणे ही महत्त्वाचे आहे .जागरूक राहून स्वतःच्या हक्काचे संरक्षण करणे तसेच इतरांनाही होणाऱ्या फसवणुकीपासून परावृत्तकरणे आवश्यक आहे. विविध भेसळ आणि निकृष्ठ वस्तू मुळे ग्राहकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे. विविध आजारांनाही खाद्यपदार्थां मधील भेसळेतून निमंत्रण दिले जात आहे .यासाठी ग्राहक आणि जागरूक होऊन आरोग्य आणि आपल्या हक्क, कर्तव्याबाबतही जागृत रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top