dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

साहिल पाटील यांची रील ठरली ‘बेस्ट रील’ : पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या हस्ते बक्षीस वितरण

जालना : जिल्हा पोलीस अधीक्षक जयकुमार बंसल यांच्या संकल्पनेतून आयोजित ड्रग्सविरोधी जनजागृती रील स्पर्धेत जालना शहरातील साहिल पाटील आणि लखन जाधव यांनी सादर केलेली रील ‘सर्वोत्कृष्ट रील’ म्हणून निवड झाली आहे. त्यांना आज सोमवार, 15 डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख 15 हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. 

या स्पर्धेचा उद्देश तरुणांमध्ये ड्रग्सच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता. जिल्हाभरातून अनेक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. प्रभावी संदेश, कल्पक सादरीकरण आणि सामाजिक जबाबदारीचा ठसा उमटवणारी साहिल पाटील, लखन जाधव, तुषार खरात, डॉ. बळीराम बागल आणि निखिल चौधरी यांची रील परीक्षकांनी सर्वोत्कृष्ट ठरवली.या यशाबद्दल पोलिस विभागाकडून आणि नागरिकांकडून साहिल पाटील यांचे आणि टीमचे कौतुक करण्यात येत आहे. त्यांनी या यशाचे श्रेय जालना पोलीस दलाच्या सामाजिक उपक्रमांना आणि तरुण पिढीला जागृतीच्या दिशेने प्रेरणा देणाऱ्या या संकल्पनेला दिले आहे. 

     या कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी परीक्षक पोलिस निरीक्षक बंडू नागरे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड, साजिद अहमद, आरती जाधव, पोलिस कर्मचारी निरंजन चव्हाण, पूनम भेट, गजानन आहेर, पूजा जाधव आणि संजय सोनवणे यांनी या स्पर्धेसाठी परिश्रम घेतले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top