छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत सुरू असलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या नव्या धोरणानुसार नागरी आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक मनुष्यबळ यापुढे थेट भरतीद्वारे नियुक्त न करता सेवा कंत्राट पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहे.
आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या 7 ऑगस्ट 2026 रोजीच्या पत्रानुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, 15 वा वित्त आयोग तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनांअंतर्गत सुरू असलेल्या सर्व भरती प्रक्रिया तत्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या योजनांसाठी यापूव प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती जाहिराती आता रद्द समजण्यात येणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत सुरू असलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या नव्या धोरणानुसार नागरी आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक मनुष्यबळ यापुढे थेट भरतीद्वारे नियुक्त न करता सेवा कंत्राट पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहे.
आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या 7 ऑगस्ट 2026 रोजीच्या पत्रानुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, 15 वा वित्त आयोग तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनांअंतर्गत सुरू असलेल्या सर्व भरती प्रक्रिया तत्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या योजनांसाठी यापूव प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती जाहिराती आता रद्द समजण्यात येणार आहेत.

शासनाच्या नव्या धोरणानुसार नागरी आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक असलेले वैद्यकीय तसेच इतर मनुष्यबळ ठोक मानधन तत्त्वावर बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून घेतले जाणार आहे. यासाठी सेवा कंत्राटाची पद्धत अवलंबली जाणार असून, संबंधित मनुष्यबळाची नियुक्ती पूवप्रमाणे थेट महानगरपालिका किंवा आरोग्य विभागामार्फत केली जाणार नाही.
दरम्यान, यापूव प्रसिद्ध झालेल्या भरती जाहिरातींच्या आधारे अर्ज केलेल्या उमेदवारांना या प्रक्रियेतून पुढे कोणतीही नियुक्ती दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, नव्या कंत्राटी पद्धतीनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
महानगरपालिका प्रशासनाने शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी करत संबंधित सर्व भरती प्रक्रिया रद्द केल्याचे स्पष्ट केले असून, पुढील मनुष्यबळ उपलब्धतेसाठी सेवा कंत्राटाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.