dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पिंप्री राजात गणेश आगमन मिरवणुकीत ट्रेलर घुसला; दोघे ठार, सात जखमी

करमाड : छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील  पिंप्री राजा  येथे सोमवारी (ता. १४) रात्री आठच्या सुमारास गणेश आगमन मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तर सात जण जखमी झाले. विठ्ठल रामभाऊ जाधव (वय ३८) आणि रमेश लहू बनसोडे (वय ४५, दोघेही रा. पिंप्री राजा) अशी मृतांची नावे आहेत.जखमींमध्ये गणेश सुरेश पवार (वय ३२) व त्यांचा सहा वर्षांचा मुलगा, प्रद्युम्न पाखरे (वय ३२, रा. पिंप्री राजा) आणि समाधान दादाराव सरोदे (वय २८, रा. डायगव्हाण, ता. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे. अन्य जखमींची नावे समजू शकली नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एमएच २१ बीएच ७४१६ क्रमांकाचा ट्रेलर दहेगाव-करमाड मार्गावरून करमाडच्या दिशेने येत होता. पिंप्री राजा गावाजवळील वळणावर ट्रेलरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्याचवेळी गावातून गणेशमूर्ती घेऊन मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीतील ट्रॅक्टरला ट्रेलरने पाठीमागून जोरदार धडक दिली.धडकेनंतर ट्रेलर अनियंत्रितपणे पुढे गेल्याने मिरवणुकीतील एका दुचाकीस्वाराला धडक बसली आणि दुचाकी ट्रेलरच्या समोरील चाकाखाली आली. अचानक घडलेल्या या थरारक घटनेमुळे मिरवणुकीत एकच खळबळ उडाली. नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी धावाधाव केली. घटनास्थळी आरडाओरड आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, जमादार जयसिंग नागलोत यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांसह शिवसेना कार्यकर्ते कृष्णा पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत केली.अपघातामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. गणेश आगमनाच्या उत्साहात सुरू असलेल्या मिरवणुकीतच भीषण दुर्घटना घडल्याने पिंप्री राजा गावावर शोककळा पसरली. या घटनेने गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले.
दरम्यान, ट्रेलरचे ब्रेक नेमके कोणत्या कारणामुळे निकामी झाले, अपघाताच्या वेळी वाहनाचा वेग किती होता, तसेच अपघाताची अन्य कारणे कोणती, याचा तपास करमाड पोलिसांकडून सुरू आहे. अपघातप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, तपासानंतर दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top